महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझ्या नावाची चर्चा ऐकतेय.., मात्र प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय वरिष्ठ घेतील - पंकजा मुंडे - post

चौंडी हे अहिल्याबाईंचे जन्मस्थळ असल्याने धनगर समाजाची मोठी श्रद्धा या स्थळाशी जोडलेली आहे. येथील विकासकामे झपाट्याने सुरूच आहेत. अहिल्याबाईंचे कार्य हे अद्वितीय असल्याने चौंडी हे राष्ट्रीय स्थळ आहे. विकासकामे सुरूच आहेत, भविष्यात या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा नक्की मिळणार असल्याचे आश्वासन मुंडे यांनी या वेळी दिले. राष्ट्रीय स्मारकाचा दर्जाचा निर्णय होत नसल्याबद्दल आज राष्ट्रवादीचे नेते खा. उदयनराजे भोसले आणि खा. सुप्रिया सुळे यांनी चौंडीत सरकारवर टीका केली होती.

माझ्या नावाची चर्चा ऐकतेय.., मात्र प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय वरिष्ठ घेतील - पंकजा मुंडे

By

Published : May 31, 2019, 9:00 PM IST

अहमदनगर - रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याने रिकाम्या झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आशावादी असल्याचे बोलले जात आहे. आज चौंडीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आल्या होत्या. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पंकजा मुंडे यांना छेडले असता, त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत माझ्या नावाची चर्चा मी माध्यमांकडूनच ऐकत आहे. मात्र, मला याबाबत माहिती नाही. त्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, पाहुयात काय होतय ते..अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

माझ्या नावाची चर्चा ऐकतेय.., मात्र प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय वरिष्ठ घेतील - पंकजा मुंडे

आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 294 व्या जयंती सोहळ्या निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार. संभाजीराजे छंत्रपती, जलसंधारण मंत्री राम शिंदे आदी नेते उपस्थित होते.

अहिल्याबाईंचे राष्ट्रीय स्मारक होणारच -

चौंडी हे अहिल्याबाईंचे जन्मस्थळ असल्याने धनगर समाजाची मोठी श्रद्धा या स्थळाशी जोडलेली आहे. येथील विकासकामे झपाट्याने सुरूच आहेत. अहिल्याबाईंचे कार्य हे अद्वितीय असल्याने चौंडी हे राष्ट्रीय स्थळ आहे. विकासकामे सुरूच आहेत, भविष्यात या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा नक्की मिळणार असल्याचे आश्वासन मुंडे यांनी या वेळी दिले. राष्ट्रीय स्मारकाचा दर्जाचा निर्णय होत नसल्याबद्दल आज राष्ट्रवादीचे नेते खा. उदयनराजे भोसले आणि खा. सुप्रिया सुळे यांनी चौंडीत सरकारवर टीका केली होती.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पंकजा मुंडेंनी घेतली फिरकी -

आम्हाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे आम्ही आनंदोत्सवात आहोत. मात्र, दारुण पराभवामुळे आघाडीचे नेते सध्या दु:खात आहेत. त्यामुळे त्यांच्या गाठीभेटीत काय चर्चा झालीय हे मी माध्यमातूनच ऐकतेय. मला त्यांच्यातील चर्चा कळली तर जरूर बोलेन, असा टोमणा पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा झडत असल्या बद्दल मारला.

शपथविधी सोहळ्याच्या आठवणीने पंकजा गहिवरल्या -

पंकजा मुंडे काल दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत गेल्या खऱ्या, मात्र त्यांनी शपथविधी स्थळी जाण्याऐवजी टीव्हीवरच सोहळा पाहिला. 2014 च्या शपथविधी सोहळ्यात स्व. गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेतली होती. मात्र, आज ते नसल्याच्या आठवणीने उर भरून आला आणि कार्यक्रम स्थळी जाण्याची हिम्मत झाली नाही. आज चौंडीतील भाषणात कालची आठवण सांगताना पंकजा यांना काहीशे गहिवरून आले होते.

मी केवळ मराठ्यांसाठी नव्हे तर सर्व समाजासाठी काम करत आहे - संभाजीराजे

मराठा समाज सुद्धा बहुजनच आहे. म्हणूनच मी मराठा आंदोलनात पुढाकार घेतला. मात्र, याचा अर्थ असा नाही की मी फक्त मराठा समाजसाठीच काम करतो. धनगर आरक्षणासाठी सुद्धा मी आग्रही आहे. असे खासदार.संभाजीराजे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details