शिर्डी ( अहमदनगर ) -साईबाबाच्या शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची ( Guru Pornima ) आज मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे.साईबाबांना आपले गुरु मानणारे लाखो भक्त आज शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रत्येक भक्त आज स्वताला धन्य मानत आहे.
व्यास पौर्णिमा -गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हटले जाते. सन 1908 साली साईबाबाच्या अनुमतिने या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली. साईबांचे परमभक्त तात्यासाहेब नूलकर, तात्या कोते पाटील आणि काही भक्तांनी व्यास पौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून पूजा केली आणि तेव्हापासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवला सुरुवात झाली. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतीमा, विणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली. द्वारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन मिरवणूक गुरूस्थान मंदिराच्या मार्ग समाधी मंदिरात आणण्यात आली आणि आजच्या गुरुपोर्णिमा उत्सवच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.
लाखोंचा जनसागर उसळला -साईबाबाच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कान्या कोपऱ्यातून आज लाखो भक्त ( Big Crowd Of Devotees ) आले असून पूणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. सन 1908 साली साईबाबांच्या अनुमतीने सुरु झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवला आज 115 वर्षा पूर्ण झाली आहेत. साईबाबा संस्थानच्यावतीने भक्तांना व्यवस्थित साईबाबाचे दर्शन मिळावे यासाठी आज रात्रभर मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. शिर्डीच्या साईबाबांना ( shirdi sai baba ) गुरू स्वरुप मानून गुरू प्रती आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला आहे. गुरूपोर्णिंमा उत्सवात तीन ते चार लाख भाविक साई समाधीवर नतमस्तक झाले आहेत. साईंच्या गुरूस्थान मंदिरातही भाविकांची रिघ लागली आहे. साईनामाचा गजर करत हजारो भाविक पायी चालत शिर्डीला येत आहेत. पायी साईपालख्यांमुळे शिर्डीतील सर्व मुख्य रस्ते गर्दीन फुलून गेलेत.