अहमदनगर- जिल्ह्यात दुष्काळची दाहकता दिवसेंदिवस भीषण बनत चालली आहे. जिल्ह्याची तहान भागवणाऱया मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील नागरिकांनाच हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वनवन फिरावे लागत आहे. याच पाण्याच्या विवंचनेतून काही ग्रामस्थांवर स्थलांतरीत होण्याची वेळही आली आहे.
धरण उशाला, कोरड घशाला; पाण्यामुळे नागरिकांवर स्थलांतरीत होण्याची वेळ - rahuri
राहुरी तालुक्यात बुळेपठार हे आदिवासी महसूल दर्जाचे गाव आहे. जिल्ह्याला पाणी पुरवणाऱया मुळा धरणापासून हे गाव फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. तरीही या गावाला अद्यापही नळयोजना किंवा पाणीयोजना पोहोचु शकली नाही.
राहुरी तालुक्यात बुळेपठार हे आदिवासी महसूल दर्जाचे गाव आहे. जिल्ह्याला पाणी पुरवणाऱया मुळा धरणापासून हे गाव फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. तरीही या गावाला अद्यापही नळयोजना किंवा पाणीयोजना पोहोचु शकली नाही. २०० लोकसंख्या असलेले हे गाव उंच पठारावर असल्याने येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. येथील विहिरी, बोअरवेलही कोरडे पडले आहेत.
या गावाला दिवसाआड टँकर येतो आणि त्यासाठीही तासंतास वाट बघावी लागत आहे. यातूनही एका व्यक्तीला केवळ २० लीटरच पाणी मिळते. त्यामुळे जनावरांना, कपडे, भांडी आणि अंघोळीसाठी पाणी आणायचे कुठून हा मोठा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. याच पाण्याच्या विवंचनेतून येथील काही ग्रामस्थांना स्थलांतरीत होण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तरी आमच्या व्यथा जाणून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.