अहमदनगर- समाजसेवक अण्णा हजारे हे एक आदर्शवत महान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी केवळ गावालाच नव्हे तर मला आणि अगदी पंतप्रधानांनासुद्धा वेगवेगळ्या ग्रामविकासाच्या प्रयोगाद्वारे मार्ग दाखविला आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काढले. ते राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंच्या भेटीनंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते.
राज्यपाल गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यात होते. त्यांनी मुंबईला परतण्यापूर्वी समाजसेवक अण्णा हजारेंची राळेगणसिद्धीमध्ये भेट घेतली.
राज्यपालांनी अण्णा हजारेंची घेतली भेट हेही वाचा-शरद पवार अन् नितीन गडकरींकडून खूप काही शिकण्यासारखे - राज्यपाल
राळेगणसिद्धीच्या विकासाचे गमक सांगितले-
अण्णा हजारेंनी ग्रामविकासाला महत्वपूर्ण ठरलेल्या तीन प्रयोगांची माहिती राज्यपाल कोश्यारी यांना दिली. या प्रयोगांची राज्य आणि देश पातळीवर अंमलबाजवणी गरजेची असल्याचे सांगितले. सदोष नाला बंडीग ऐवजी शास्त्रशुद्ध नाला बंडीगची निर्मिती, दूध, फळ-भाजीपाला अशा पूरक शेती उद्योगांची निर्मिती आणि सोलर प्रकल्पाची गरज आणि सोलर ऊर्जानिर्मिती यावर सुरू असलेल्या कामांची माहिती समाजसेवक अण्णा यांनी राज्यपालांना दिली.
हेही वाचा-नवीन पिढीला नशेच्या विळख्यातुन बाहेर काढले पाहिजे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
देशात अनेक प्रशिक्षण केंद्र आहेत. पण नेतृत्व निर्माण करणारे प्रशिक्षण केंद्र नाहीत. त्याची खरी गरज असल्याचे अण्णांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. राज्यपालांनीही अण्णांनी राबवलेले प्रयोग आणि नेतृत्व निर्माण करणारी प्रशिक्षण केंद्र यावर उच्च पातळीवर चर्चा करू, असे आश्वासन दिले.
हेही वाचा-गांधी जयंती निमित्ताने राज्यपाल वर्धा शहरात; बापू कुटीला भेट देणार
राज्यपालांनी दिले राजभवन भेटीचे निमंत्रण-
राज्यपाल कोश्यारी यांनी अण्णांना राजभवनावर भेटीचे आमंत्रण दिले. आपण दहा-बारा गावातील तरुणांना सोबत घेऊन राजभवनावर या. एक पूर्ण दिवस तुमच्या आणि राळेगणसिद्धीच्या तरुणांसोबत मला घालवायचा आहे, असे राज्यपालांनी स्नेहपूर्वक अण्णांना सांगितले.
आमदार-खासदार आणि नामदार होण्यापेक्षा वेद्यकीय क्षेत्रात काम करा
आमदार-खासदार आणि नामदार होण्यापेक्षा वेद्यकीय क्षेत्रात काम करा, आमदार खासदारांना शिव्याही पडतात, हे सुजय विखेंनाही आता समजत असेल. तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करत राहील्यास पुढच्या दहा पिढ्या तुमच्या चांगल्या तयारी होतील, असा सल्ला आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राजकारण्यांना दिला आहे. प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमीपूजन व डॉ.बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणी येथे झाले. यावेळी ते बोलत होते.