महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर येथील दिव्यांग कोरोनाबाधित रुग्णाचा पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यू

चार दिवसांपूर्वी रुग्णाला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे दाखल झाल्यानंतर त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज सकाळी उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

corona ahmadnagar
प्रतिकात्मक

By

Published : Apr 10, 2020, 5:12 PM IST

अहमदनगर- श्रीरामपूर येथील दिव्यांग कोरोनाबाधित रुग्णाचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली. प्रकृती बिघडल्याने रुग्णाला ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून केलेल्या कोरोना चाचणीत रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले होते.

या रुग्णाला प्राथमिक सर्दी खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने त्याला प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रुग्णाची कोरोना चाचाणी करण्यात आली होती. यात रुग्ण कोरोनाबाधित नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, नंतर रुग्णाला जास्त त्रास होत असल्याने त्याला चार दिवसांपूर्वी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे दाखल झाल्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज सकाळी उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-मरकज कनेक्शन पाथर्डीपर्यंत; कुटुंबातील १२ जण तपासणीसाठी रुग्णालयात

ABOUT THE AUTHOR

...view details