शिर्डी- जलशक्ती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आराखड़्याबाबत जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची शिर्डीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. जलशक्ती अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या पाच तालुक्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत, याबाबत जलशक्ती अभियानाच्या नोडल अधिकारी रिचा बागल यांनी माहिती दिली.
बागायती समजल्या जाणाऱ्या उत्तर नगर जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातील भुजल पातळी खालावल्याने केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत जलशक्ती अभियान राबविले जात आहे. या अभियानात राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरी या पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.