महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदेशी मंत्र्यांनी घेतले साई समाधीचे दर्शन - साईबाबांचे भव्‍य मंदिर

मंगळवारी मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्‍वे मंत्री एलन गेणू यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

विदेशी मंत्र्यांनी घेतले साई समाधीचे दर्शन
विदेशी मंत्र्यांनी घेतले साई समाधीचे दर्शन

By

Published : Jan 21, 2020, 10:04 PM IST

अहमदनगर - 'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील सर्व सामान्य भक्तांबरोबर आता विदेशी मंत्रीही साईचरणी नतमस्तक होण्यास शिर्डीत दाखल झाले होते. मंगळवारी मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्‍वे मंत्री एलन गेणू यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

विदेशी मंत्र्यांनी घेतले साई समाधीचे दर्शन

मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्‍वे मंत्री एलन गेणू साई दर्शनानंतर 'ई टीव्ही भारतशी' बोलत होते. ते म्हणाले, मॉरिशस या देशात सुमारे ६० टक्‍के हिंदु लोक वास्‍तव्‍य करतात. तेथे साईबाबांची ५ ते ६ छोटी मंदिरे असून भाविक बाबांच्‍या दर्शनाकरीता त्या ठिकाणी गर्दी करत असतात. यामुळे आम्‍ही गंगालेख येथे साईबाबांचे भव्‍य मंदिर बांधण्‍याचे ठरवले आहे. यासाठी जागाही निश्चित करण्‍यात आली असल्‍याचे सांगून आज साईबाबांचे दर्शन घेऊन अतिशय आनंद झाला असल्‍याचे गेणू यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details