डॉक्टर प्रतिम वडगावे यांची प्रतिक्रिया शिर्डी Shirdi Food Poisoning : लग्नातील जेवणातून अनेकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. साई पालखी निवारा येथे रविवारी एक लग्न होतं. दुपारी लग्न लागल्यानंतर पाहुण्यांना जेवण वाढण्यात आलं होतं. जेवणानंतर वऱ्हाडी मंडळींना मळमळ, उलट्या तसंच जुलाबाचा त्रास (Shirdi Poisoning News) झाला. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींना तातडीनं साई संस्थानच्या साईनाथ (Sai Sansthan Hospital Shirdi) तसंच साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. आतापर्यंत वीस ते पंचवीस जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.
जेवणातून विषबाधा :शिर्डीजवळील साई पालखी निवारा येथे रविवारी एक विवाहा पार पडला. या विवाह सोहळ्यात आलेल्या वराडी पाहुण्यांना जेवणात रबडी, कोबी भाजी, पनीर भाजी, डाळ, भात, पुरी, चपाती असं जेवण ठेवण्यात आलं होतं. मात्र, दुपारी जेवण झाल्यानंतर अनेकांना अचानक उलट्या, पोट दुखीचा त्रास जाणवत होता. तर काहींना मळमळसह उलट्या झाल्या. त्यामुळं जेवणातून विषबाधा झालेल्या वऱ्हाडींना शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये तसंच काहींना साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यामध्ये लहान मुलांसह महिला, पुरुषांचा समावेश आहे.
सर्वांची प्रकृती स्थिर : शिर्डीतील एका व्यावसायिकाच्या मुलीचा विवाह साई पालखी निवारा येथे पार पडला. या लग्नाला मोठ्या संख्येनं पाहूण्यांची गर्दी होती. मात्र, दुपारी लग्नसमारंभात जेवण केल्यानंतर अनेकांना अन्नातून विषबाधा झाली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आतापर्यंत सुमारे 60 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं साई संस्थानच्या वैद्यकीय संचालकांनी सांगितलं.
याआधीही घडली होती विषबाधेची घटना : अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या ८२ विद्यार्थ्यांसह ६ शिक्षकांना फेब्रुवारी 2023 मध्ये विषबाधा झाली होती. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलमधील हे विद्यार्थी होते. शिर्डीत येण्यापूर्वी त्यांनी शेवगावजवळ दुपारचे जेवण केले आणि त्यानंतर शिर्डीत दाखल होत साईबाबांचे दर्शन घेतले. मात्र, रात्री देवगड येथे मुक्कामी निघाले असताना विद्यार्थी आणि काही शिक्षकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले होते.
हेही वाचा -
- All Religions March In Shirdi : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ शिर्डीत सर्वधर्मीयांचा मोर्चा
- Shirdi Saibaba donation : साईबाबा प्रसादालयात साडेतीस लाखांचं 'पीठाचं यंत्र' दान, पहा व्हिडिओ
- Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी शिर्डी राहणार बंद; साईबाबा मंदिर खुलं