महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरला साक्षात यमराज...! - nashik road

मिलिंद काशिनाथ पगारे असे जगजागृती करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. यमराजाचा वेश परिधान करून हातात ध्वनिक्षेपक घेतलेला त्यांचा अवतार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरला साक्षात यमराज

By

Published : Jul 17, 2019, 11:59 AM IST

अहमदनगर- रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने चालवताना वाहतुकीचे नियम अक्षरशः पायदळी तुडवले जातात. कोणी घाईगडबडीत सिग्नल मोडतो, तर कोणी विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने वाहन दामटतो, मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे तर सर्रास दिसतात, अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नाशिकच्या एका अवलियाने विडा उचललायं. चक्क यमराजाचा वेश परिधान करुन तो रस्त्यावरुन वाहतूक सुरक्षा जनजागृती करत फिरत आहे. सध्या हा यमराज पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरला आहे.

वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरला साक्षात यमराज

मिलिंद काशिनाथ पगारे असे जगजागृती करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील रस्त्यांवर ते वाहनचालकांचे प्रबोधन करत आहेत. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आपण अनेक शहरामध्ये फिरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यमराजाचा वेश परिधान करून हातात ध्वनिक्षेपक घेतलेला त्यांचा अवतार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गर्दीच्या ठिकाणी उभे राहून ते वाहनचालकांचे प्रबोधन करत आहेत. पगारे यांनी गेले ४० वर्ष खासगी कंपनीत नोकरी केली आहे. मात्र, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने रस्त्यावर उतरुन जगजागृती करण्याचा निर्णय घेतल्याचे पगारे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details