महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार तर 10 जखमी - Ahmednagar accident

चार वाहनांच्या विचित्र अपघातात कृष्णा मल्हारी बोरुडे, सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या इतर दहा जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नगर-सोलापूर रोडवरच्या कोकणगावच्या शिवारात बोराडे वस्तीजवळ हा अपघात घडला.

भीषण अपघात
भीषण अपघात

By

Published : Apr 30, 2022, 7:10 AM IST

अहमदनगर - सोलापूर महामार्गावर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जीव गेला. तर अनेक प्रवासी जखमी झाले. मालवाहतूक करणारा एक ट्रक, एक रीक्षा, क्रूझर जीप आणि टू व्हिलर गाडी यांच्यात धडक होऊन विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर जीप आणि ट्रक यांच्यासह रिक्षाचंही मोठं नुकसान झाले.

नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

विचित्र अपघात - चार वाहनांच्या विचित्र अपघातात कृष्णा मल्हारी बोरुडे, सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या इतर दहा जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नगर-सोलापूर रोडवरच्या कोकणगावच्या शिवारात बोराडे वस्तीजवळ हा अपघात घडला. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेत मदतीचा हात दिला. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरुडे वस्ती येथून एक मालवाहू ट्रक जात होता. हा ट्रक सोलापूरहून नगरच्या दिशेने निघाला. तर इतर वाहनं नगरहून सोलापुरच्या दिशेनं जात होती. टीएन 88 एक्स 9243 या क्रमाकांच्या मालवाहून ट्रकनं एमएच 09 बीएम 9859 या क्रमांची क्रूझर आणि एमएच 09 डीएम 4557 या क्रमांकाच्या ऍपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही रिक्षा रस्त्यावर पलटली. तर क्रूझरला दिलेल्या धडकेत गाडीचंही मोठं नुकसान झालं. या अपघातात 25 वर्षीय तरुण कृष्णा मल्हारी बोरुडे याच्यासह सोपान दिनकर जागीच ठार झाले होते. तर गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना तत्काल रुग्णालयात उपचारासाठी नगरला आणण्यात आलं.

ABOUT THE AUTHOR

...view details