महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले मोठे संकट - माजी मंत्री राम शिंदे

महाविकास आघाडी सरकार म्हणजे, महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट आहे. पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्य असून जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहे. हे सरकार लवकरच कोसळेल, कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली.

Ram Shinde's criticism on Chief Minister
माजी मंत्री राम शिंदे

By

Published : Nov 28, 2020, 4:24 PM IST

अहमदनगर - महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट आहे. पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्य असून जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहे. सरकारकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

माजी मंत्री राम शिंदे

राज्य सरकार दमबाजी आणि दमदाटी करणारे असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. हे सरकार लवकरच कोसळेल, कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. कोरोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आला. सध्या पाणी आहे, तर वीज नाही, डीपी जळत आहेत, कुठलाही दूरदृष्टिकोन नसलेले हे सरकार असल्याचे राम शिंदे म्हणाले.

हेही वाचा -शेतकरी मोर्चावर अमानुष दडपशाही; किसान सभेकडून केंद्र सरकारचा निषेध

ABOUT THE AUTHOR

...view details