महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. सुजय विखे पाटलांचा दणदणीत विजय; राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा पराभव - constituency

काही फेऱ्यांचे निकालाची मोजणी शिल्लक असल्याने अद्याप अधिकृत घोषणा नाही.

कोण होणार नगरचा कारभारी?

By

Published : May 23, 2019, 6:03 AM IST

Updated : May 23, 2019, 4:54 PM IST

अहमदनगर - नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला. राष्ट्रवादीने ही लढत मोठ्ठी प्रतिष्ठेची केली होती. मात्र, यामध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांनी 'बाजी' मारली आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीपासून सुजय विखे पाटलांनी आघाडी मिळवली होती.

LIVE UPDATE -

  • 4:00 - विसावी फेरी, डॉ. सुजय विखे पाटील 1 लाख 28 हजापर 241 मतांनी आघाडीवर
  • 3: 00 -सतरावी फेरी, डॉ. सुजय विखे पाटील 1 लाख 95 हजार मतांनी आघाडीवर
  • 2:30 - पंधरावी फेरी, डॉ. सुजय विखे पाटील 1 लाख 78 हजार मतांनी आघाडीवर सुजय विखेंना मिळालेली मते
  • 10:45 - डॉ. सुजय विखे पाटलांना पाचव्या फेरी अखेर 1 लाख 44 हजार 841 मते मिळाली तर, संग्राम जगताप यांना 82 हजार 748 मते मिळाली
  • 10:00 - भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील 29274 मतांनी आघाडीवर
  • 9:15 - डॉ. सुजय विखे पाटील 4500 मतांनी आघाडीवर; संग्राम जगताप पिछाडीवर
  • 8:50 - डॉ. सुजय विखे पाटील 12346 आघाडीवर; संग्राम जगताप पिछाडीवर
  • 8:30 - भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील 1243 मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप पिछाडीवर
  • अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सपत्नीक आपल्या मुळ लोणी गावी जाऊन घेतले हनुमान मंदिर, ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच घेतले दर्शन
  • दर्शनानंतर सुजय नगर येथे मतमोजणीकडे रवाना
  • विजयाचा व्यक्त केला आत्मविश्वास ...

अहमदनगर- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघ खूपच चर्चेत राहिला. कारण, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने लगेचच त्यांना उमेदवारीही दिली. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीनेही ही लढत प्रतिष्ठेची करत संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार यंदाच्या लोकसभेच्या रणांगणात कोण बाजी मारणार? हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल.


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट केला होता. त्यानंतर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. या सगळ्या घडामोडीत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे राष्ट्रावादीनेही खेळी करत कर्डिलेंचे जावई आणि विद्यमान आमदार आघाडीकडून संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे कर्डिलेंची भूमिका कोणाच्या बाजूने होती हे देखील या निकालानंतर स्पष्ट होणार असून त्याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत 64.24 टक्के मतदान झाले आहे.


2014 लोकसभेत कोणाचे होते पारडे जड -
2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार दिलीप गांधी यांना 6 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे राजीव राजाळेंना 3 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. दिलीप गांधींचा त्यावेळी दणदणीत विजय झाला होता.


जिल्ह्यातील पक्षीय बलाबल -
नगर लोकसभा मतदारसंघात शेगाव, राहुरी, कर्जत जामखेड हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पारनेर विधानसभा शिवसेनेकडे आहे तर अहमदनगर शहर आणि श्रीगोंदा या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.

Last Updated : May 23, 2019, 4:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details