महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात ५ तासांनी यश - bibtya

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्यास वन विभागाच्या पथकाच्या प्रयत्नाने सुखरूप वर काढण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करून त्याची सुटका करण्यात आली आहे.

विहिरीत पडलेला बिबट्या

By

Published : Sep 3, 2019, 2:25 PM IST

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्यास वन विभागाच्या पथकाने तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नाने सुखरूप वर काढण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करून त्याची सुटका करण्यात आली आहे.

बिबट्याला बाहेर काढताना

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील संजय वरखडे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी मध्यरात्राी भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पडलाय होता. ही काल (सोमवार) सकाळी येथील वरखडे यांनी विहिरीत डोकावल्यानंतर लक्षात आली. त्यानंतर लागलीच याची माहिती देवळाली नगरपालिका नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तात्काळ दिली.


त्यांनतर कदम यांनी याबाबत वनविभागास कळवले. ग्रामस्थ आणि वन विभागाच्या मदतीने विहरीत पिंजरा सोडण्यात आला होता. तब्बल ५ तासांच्या प्रयत्नाने अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. त्याच्यावर वन विभागाच्या वतीने उपचार करण्यात आले असून त्याची सुटका करण्यात आली आहे. यावेळी वनविभागाचे गोरक्षनाथ लोंढे, लक्ष्मण किनकर, सचिन गायकवाड, वामन लांबे, बाळासाहेब दिवे, जयराम सागर आदिंनी परीश्रम घेतले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details