महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाईफ ऑफ पाय..! कोरड्या विहिरीत बिबट्या, कुत्र्याने सोबत काढली रात्र

कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे लागलेल्या बिबट्याला आपला जीव वाचविण्यासाठी कुत्र्याबरोबरच कोरडया विहीरीत रात्र काढावी लागली. ही घटना संगमनेर तालुक्यातील चिखली राजापूर येथे पाहावयास मिळाली. यावेळी कुत्रा आणि बिबट्या यांची प्राण वाचवण्यासाठीची झुंज आणि परिस्थितीमुळे येणारी हतबल अवस्थाही नागरिकांना अनुभवता आली.

कोरड्या विहिरीत बिबट्या आणि कुत्र्याची झुंज

By

Published : May 9, 2019, 2:28 PM IST

अहमदनगर- संकटात सापडल्यावर वाघदेखील शांत होऊन परिस्थितीला शरण येतो. याचे उत्तम चित्रण ईरफान खानची प्रमुख भूमिका असलेल्या लाईफ ऑफ पाय या चित्रपटात पाहायला मिळाले. त्याप्रमाणेच सुरुवातीला एका कुत्र्याची शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला त्या कुत्र्यासोबतच रात्र घालवण्याची वेळ आल्याची घटना संगमनेर तालुक्यातील चिखली राजापुरात पाहायला मिळाली. यावेळी कुत्रा आणि बिबट्या यांची प्राण वाचवण्यासाठीची झुंज आणि परिस्थितीमुळे येणारी हतबल अवस्थाही नागरिकांना अनुभवता आली.

कोरड्या विहिरीत बिबट्या आणि कुत्र्याची झुंज

शिकारीसाठी एक बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत होता. मात्र हा खेळ सुरू असतानाच हे दोघेही चिखली राजापूर येथील शेतकरी विष्णु खतोडे यांच्या घरामागील ५० फूट खोल कोरड्या विहिरीत पडले. या विहिरीत पडल्यानंतर मात्र, त्यांच्यातील संघर्ष शमला. कदाचीत वाचायचे असेल तर शांत बसणेच चांगले, असे त्यांनी ठरवले असावे.

कुत्रा आणि बिबट्या दोघेही १० तास विहिरीत अडकून होते. सकाळी घरी कुत्रा दिसत नसल्याने त्याची शोधाशोध केली असता विहिरीतून कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. त्यावेळी घराच्या मागे जावून विहिरीत डोकावले असता, विहिरीत बिबट्या आणि कुत्रा दिसून आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट कळवण्यात आली.

वनविभागाला माहिती कळताच या दोघांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आधी ग्रामस्थांनी एक टोपली दोरीच्या सहाय्याने विहिरीत सोडली आणि कुत्र्याला बाहेर काढले. नंतर पिंजरा सोडत बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला बाहेर काढून त्याची रवानगी रोपवाटीकेत करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details