अहमदनगर- निवडणूक जाहीर होताच भाजप-सेना युतीला मोठा धक्का बसला आहे. मात्र जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला या गळतीचा मोठा फायदा झाला आहे. काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. इगतपुरी आणि श्रीरामपूरमधून अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे यांनी आज प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी लहू कानडे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांच्या पक्षप्रवेश झाला. हा पक्षप्रवेश सोहळा संगमनेर येथे पार पडला. कानडे यांनी २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. मात्र त्यांना ३८ हजार एवढी मते मिळाली होती. गेली पाच वर्षे ते शिवसेनेत होते. त्यांनी लोकसभेचीही उमेदवारी मागितली होती. मात्र शिवसेनेने त्यांच्या ऐवजी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली होती.
त्यांनी सेनेचे काम केले. विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर मतदार संघातून त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र ऐनवेळी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. दरम्यान त्यांची उमेदवारीही निश्चित झाली आहे. त्यामुळे कानडे नाराज झाले आहे. मात्र त्यांच्या संपर्कात काँग्रेसचे नेते होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. ही बैठक संगमनेर येथे थोरात यांच्या निवासस्थानी झाला होती. या बैठकी दरम्यान त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.
हेही वाचा-खासदार सुजय विखेंच्या शिष्टाईनंतर नामदेव राऊतांचे बंड थंड; राम शिंदेंचा करणार प्रचार