महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईबाबांच्या मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव; दर्शनासााठी लाखो भाविक साईनगरीत - श्रीकृष्ण जन्माष्टमी

साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावत असतात. साईमंदिरात किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन शेजारती करण्यात आली आहे.

शिर्डी

By

Published : Aug 24, 2019, 7:57 AM IST

शिर्डी- देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे. साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाल कन्हैयाचे गुणगान केले जाते. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली़ आहे.

साईबाबांच्या मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव

साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावत असतात. साईमंदिरात किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन शेजारती करण्यात आली आहे. आज(शनिवार) दुपारी मध्यान्ह आरतीअगोदर बारा वाजता साई समाधीसमोर दहीहंडी फोडली जाते.

गोकुळ अष्टमीच्या दिवशी साईंच्या मंदिरात कृष्ण जन्म आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. चांदीच्या पाळण्यात बालकृष्णाची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन झाल्यानंतर जन्म उत्सव साजरा करण्यात येतो. गोपालकाल्याच्या दिवशी दिवसभर साईसमाधीवर गोपाल कृष्णाचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाते. साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक लिला दाखवल्या आहेत. साईबाबांनी एका भक्ताला कृष्णाच्या रुपात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details