शिर्डी -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने निर्बंध कडक आणि विक-एन्ड लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र त्यास अनेक व्यवसायिकांचा विरोध आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी हे व्यापारी व्यवसायिक वेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत.
लॉकडाऊनला विरोध करत व्यापाऱ्यांचे अनोखे कायदेपालन आंदोलन - ahmednagar lockdown
सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आज कोपरगाव शहरातील छोट्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर हाताला, डोक्याला काळ्या फिती बांधून कोरोना प्रतिबंधित सर्व नियमांचे पालन करून सविनय कायदे पालन करत अनोखे आंदोलन केले.
व्यापाऱ्यांवर अन्याय
सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आज कोपरगाव शहरातील छोट्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर हाताला, डोक्याला काळ्या फिती बांधून कोरोना प्रतिबंधित सर्व नियमांचे पालन करून सविनय कायदे पालन करत अनोखे आंदोलन केले. शहरातील विविध ठिकाणच्या व्यापारी संकुलाबाहेर व्यापाऱ्यांनी दुकानासमोर उभे राहून हे आंदोलन केले. या आंदोलनात कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव व्यापारी समिती, व्यापारी संघर्ष समिती तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.