अहमदनगर- राज्य सरकारने दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. या निर्णयाचा महिला आणि दारुबंदी कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यातच अकोले तालुक्यात दारूचे दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
माझ्या मतदारसंघात दारू बंदी करा.. 'या' आमदाराने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र - AHMEDNAGAR NEWS
माझ्या मतदारसंघात दोन दिवसांपासून दारूची दुकाने सुरू झाली आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानामध्ये गर्दी नाही येवढी दारूच्या दुकानासमोर गर्दी होत आहे. दारूच्या दुकानासमोर लांबच्या लांब रांगा लागत आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे.
हेही वाचा-Top 10 @ 10 AM : सकाळी दहाच्या १० ठळक बातम्या; वाचा एका क्लिकवर..
माझ्या मतदारसंघात दोन दिवसांपासून दारूची दुकाने सुरू झाली आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानामध्ये गर्दी नाही येवढी दारूच्या दुकानासमोर गर्दी होत आहे. दारूच्या दुकानासमोर लांबच्या लांब रांगा लागत आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. तसेच या मद्यपींमुळे त्यांचे कौटुंबिक स्वास्थ आणि परीसरातील वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे हे कौटुंबिक अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या काळात न परवडणारे आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघात दारू बंद करावी, अशा मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.