अहमदनगर - कर्नाटकच्या १३ बंडखोर आमदारांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. मुंबईहून एका विशेष विमानाने या आमदारांचे शिर्डी विमानतळावर दुपारी आगमन झाले. यावेळी विमानतळावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडे दाखवून निदर्शने करत भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या.
कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी घेतले साईबाबांचे दर्शन, युवक काँग्रेसची घोषणाबाजी - youth congress
कर्नाटकच्या १३ बंडखोर आमदारांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. मुंबईहून एका विशेष विमानाने या आमदारांचे शिर्डी विमानतळावर दुपारी आगमन झाले.
कर्नाटकचे बंडखोर आमदार साईचरणी नतमस्तक
विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आमदारांना एका खासगी विमानाने शिर्डीत आणण्यात आले. आमदारांबरोबर भाजपचे स्थानिक पदाधिकारीही होते. साई मंदिर परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कर्नाटकचे राजकारण चांगलेच पेटले आहे. १३ आमदारांनी राजीनामा दिल्याने कुमास्वामींचे सरकार अस्थिर झाले आहे.