अहमदनगर -शेवगाव तालुक्यातील प्रभुवाडगाव ते गदेवाडी हा चार किलोमीटरचा रस्ता पावसामुळे चिखलमय झाला आहे. यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, वाहनचालक यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येसंदर्भात लोकप्रतिनिधींकडे रस्त्याच्या कामासाठी वारंवार मागणी करूनही काहीच पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे आता ग्रामस्थांनी जनअंदोलनाबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
अहमदनगर : रस्त्याची कामे करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; प्रभुवाडगांव ग्रामस्थांचा इशारा - shevgaon
प्रभुवाडगाव ते गदेवाडी रस्त्याची परिस्थीती पावसामुळे अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरून कुठलेही वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. शालेय विद्यार्थाना येण्याजाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. लोकप्रतिनिधींकडे रस्त्याच्या कामासाठी वारंवार मागणी करूनही काहीच पावले उचलली जात नाहीत.
प्रभुवाडगावची लोकसंख्या चार हजार एवढी आहे. मात्र, गावच्या प्रभुवाडगाव ते गदेवाडी रस्त्याची परिस्थीती पावसामुळे अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरून कुठलेही वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागते. शालेय विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
लोकप्रतिनिधींनी तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी येथे जोर धरत आहे. गदेवाडी ते प्रभुवाडगावदरम्यान असलेल्या शेतातून येण्याजाण्यास शेतमालक प्रतिबंध करत असल्याने अनेकदा वाद उद्भवतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागास आदेश देऊन रस्त्याची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.