अहमदनगर- नेवासा तालुक्यात कुकाणा येथे नवजात मुलीचे अर्भक फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले. तालुक्यातील देवगाव रोड परिसरात एका बंगल्याच्या पाठीमागे फेकून दिलेले अर्भक निदर्शनास आले. ही मुलगी जिवंत असून तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नेवासा तालुक्यात नवजात अर्भक सापडले - nagar news
उपचारासाठी अर्भक कुकाणा ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आला आहे. यावेळी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सारूक यांनी बाळाची तपासणी केली.
अर्भक
दरम्यान, कुकाणा ग्रामीण रूग्णालयातील आशा स्वयंसेविका ज्योती चितते यांनी तात्काळ खासगी रूग्णालयात मुलीचा अर्भक दाखल केले. त्यानंतर उपचारासाठी अर्भक कुकाणा ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आला. यावेळी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सारूक यांनी बाळाची तपासणी केली.
या अर्भकाची प्रकृती आता चांगली असून मुलीला अहमदनगर येथीव सुधार गृह स्नेहालयात नेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सारूक यांनी दिली.