महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॅमेरे बंद झाल्यावरच कीर्तन करणार, इंदोरीकरांचा सावध पवित्रा - इंदोरीकर महाराज वाद

शिवजयंती निमित्त कोपरगावात आज निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कॅमेरे बंद झाल्यावरच कीर्तन सुरु करेल चालू करेन, असा पवित्रा इंदोरीकरांनी घेतला आणि कॅमेरे बंद झाल्यानंतरच त्यांनी किर्तनाला सुरुवात केली.

इंदोरीकर महाराजांचे कीर्तन
इंदोरीकर महाराजांचे कीर्तन

By

Published : Mar 1, 2020, 11:17 PM IST

Updated : Mar 2, 2020, 3:47 AM IST

अहमदनगर- शिवजयंती निमित्त कोपरगावात आज निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. शनिवारीच तृप्ती देसाईंनी महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यामुळे आज महाराज किर्तनात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात कार्यक्रम स्थळी येताच इंदोरीकरांनी तिथे असलेले सर्व कॅमेरे बंद करायला सांगितले.

कॅमेरे बंद झाल्यावरच कीर्तन सुरु करेल चालू करेन, असा पवित्रा त्यांनी घेतला आणि कॅमेरे बंद झाल्यानंतरच त्यांनी किर्तनाला सुरुवात केली. कधी कोणाची वेळ बदलेल काही सांगता येत नाही, मी तुम्हाला पंचवीस वर्षे हसवायचे काम केले. आता माझ्यावर रडायची वेळ आली आहे. माणुस मोठा झाला की त्याला संपविण्याची काही लोक पैंजच लावतात, असे इंदोरीकर महाराज आपल्या किर्तनात म्हटले.

हेही वाचा -'बापहो...माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ काढून त्यात मोडतोड करून ते व्हायरल करू नका'

माध्यमांचे कॅमेरे बंद केलेत परंतु, मोबाईलमधील कॅमेरे सुरु असतीलच. अरे एक पट्टी सोडताना जरा विचार करा समोरच्या माणसालाही प्रपंच आहे. त्यालाही कुटुंब आहे, असे भावनिक वक्तव्य इंदोरीकरांनी आपल्या किर्तनात केले.

इंदोरीकर महाराजांचे कीर्तन

हेही वाचा -"इंदोरीकरांच्या वादग्रस्त प्रवचनामुळे वारकरी संप्रदायाचे नुकसान"

काय आहे प्रकरण -

'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका किर्तनात केले होते. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली.

Last Updated : Mar 2, 2020, 3:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details