शिर्डी -साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याचे काम पूर्ण झाले असून, या मजल्यावर नवीन अद्ययावत अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला आहे. या अतिदक्षता कक्षाचा शुभारंभ शनिवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते करण्यात आला. या अतिदक्षता कक्षासाठी मुंबईतील देणगीदार हरेश उत्तमचंदानी यांनी तब्बल 1 कोटी 43 लाख 98 हजारांची मदत केली आहे.
10 बेडचा अतिदक्षता कक्ष
श्री साईनाथ रुग्णालयात रुग्णांकरता बेडची संख्या कमी पडत असल्यामुळे, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच सन 2015 पासून जादा आय.सी.यु. कक्ष उभारण्याचे काम देखील प्रस्तावित होते. आता रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याचे काम पूर्ण झाल्यामुळे एकूण बेडची संख्या 300 झाली आहे. तसेच नविन अद्ययावत असे 10 बेडचे अतिदक्षता कक्ष देखील या ठिकाणी उभारण्यात आले आहे. श्री साईनाथ रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. या रुग्णालयामध्ये सर्व आजारांवर उपचार होत असल्याने, देशभरातून रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येत असतात.
हेही वाचा -धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री