अहमदनगर- पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात तहसीलदारांनी अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई केली. मात्र, यानंतर हे क्रशर पुन्हा सुरू झाल्याने त्याचे चित्रीकरण करणाऱ्या दोघांचा गुंडांनी पाठलाग केला. यानंतर खडी क्रशर चालक आणि त्याच्या गुंडांनी संबंधितांना बेदम मारहाण केली. त्यानंतर काही काळ डांबून ठेवले. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. खडी क्रशर चालक, वाळू माफिया, भूखंड माफिया या अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे या घटनेतून समोर आल्याची चर्चा परिसरात आहे.
अवैध खडी क्रशरचे चित्रीकरण करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण; नगरमध्ये गुंडांची दहशत - ahmednagar crime
पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात तहसीलदारांनी अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई केली. मात्र, यानंतर हे क्रशर पुन्हा सुरू झाल्याने त्याचे चित्रीकरण करणाऱ्या दोघांचा गुडांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली आहे.
पारनेर तालुक्यातील पठारवाडी शिवारात अनधिकृत खडी स्टोन क्रशर सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांनी केली होती. यानंतर तहसीलदारांनी कारवाई करत खाडी क्रशर सील केले. मात्र चालकाने पुन्हा क्रशर सुरू केले. यांची माहिती बबन कवाद यांना मिळाली होती. त्याचे शूटिंग करण्यासाठी गेलेल्या मुलांना सिनेस्टाइल पाठलाग करून मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. मात्र, अद्याप पारनेर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप कवाद यांनी केला आहे.