अहमदनगर :साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या (Shirdi Temple)वतीने मंगळवार दिनांक १२ जुलै ते गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव (How will be Celebrated Gurupournima festival in Sai temple) साजरा केल्या जाणार आहे. या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले आहे.
बानायत म्हणाल्या, गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्री साईबाबा असतांना गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे. त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. श्री साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येवून समाधीचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उत्सवाच्या प्रथम दिवशी मंगळवार दिनांक १२ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.०० वाजता व्दारकामाई येथे श्री साईसच्चरित्राचे अखंड पारायण, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.सौ.स्नेहल संतोष पित्रे, डोंबवली (ठाणे) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.५० यावेळेत श्री.अनंत पांचाळ, मुंबई यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार असून पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.
उत्सवाच्या मुख्य दिवशी बुधवार दिनांक १३ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.सौ.स्नेहल संतोष पित्रे, डोंबवली (ठाणे) यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.५० यावेळेत श्री.अविनाश गांगुर्डे, नाशिक यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक १४ जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.