अहमदनगर - अनलॉक- २ मध्ये ८ जुलैपासून राज्यात हॉटेल्स आणि लॉज उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र शिर्डीत परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणी साई मंदिर अद्याप उघडले नसल्याने स्थानिक हॉटेल्स सुरू करणे निरर्थक असल्याचे म्हणत व्यावसायिकांनी हॉटेल्स उघडण्यास नकार दिलाय. 33 टक्क्यांच्या अटी प्रमाणे किमान खर्च देखील निघणार नसल्याने हॉटेल्स न उघडण्याच्या मानसिकतेत शिर्डीतील हॉटेल व्यवसायिक आहेत.
शिर्डीतील हॉटेल्स अद्याप बंदच; भक्त नसल्याने हॉटेल व्यवसायिकांमध्ये उदासीनता
अनलॉक- २ मध्ये ८ जुलैपासून राज्यात हॉटेल्स आणि लॉज उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र शिर्डीत परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणी साई मंदिर अद्याप उघडले नसल्याने स्थानिक हॉटेल्स सुरू करणे निरर्थक असल्याचे म्हणत व्यावसायिकांनी हॉटेल्स उघडण्यास नकार दिलाय.
शिर्डीतील हॉटेल्स अद्याप बंदच; भक्त नसल्याने हॉटेल व्यवसायिकांमध्ये उदासिनता
आता राज्यभरात हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच लॉज देखील सुरू होणार आहेत. मात्र शिर्डीत याचा काहीच उपयोग नाही. या ठिकाणचे हॉटेल्स शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमुळे चालतात. सध्या साईमंदिरच बंद असल्याने हॉटेल्स उघडून उपयोग काय, असा प्रश्न व्यवसायिक विचारत आहेत. शिर्डीत छोटे मोठे असे एकूण आठशेच्या वर हॉटेल्स आहेत. मात्र शासनाच्या या निर्णयानंतरही शिर्डीतील हॉटेल्स सुरू न करण्याची भूमिका व्यवसायिकांची आहे.