अहमदनगर -शिर्डीतील साईबाबा मंदिरासमोर पारंपारिक पद्धतीने होळीची पूजा करून दहन करण्यात आले. मनातील अनिष्ट प्रवृत्ती शांत व्हावी यासाठी पालथ्या हाताने बोंब मारत भक्तांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली.
साईबाबा मंदिरात उत्साहात पार पडले होळी दहन
शिर्डीमध्ये साईबाबांच्या काळापासून होळी दहन करण्याची प्रथा आहे. यावर्षीही मंदिरासमोर पारंपारिक पद्धतीने होळीची पूजा करून दहन करण्यात आले. होळी दहनानंतर मध्यान्ह आरती पार पडली.
शिर्डीत होळी दहन
हेही वाचा -मुंबईत होळीचा उत्साह, कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने साजरी होते होळी
शिर्डीमध्ये साईबाबांच्या काळापासून होळी दहन करण्याची प्रथा आहे. सोमवारी साई मंदिराजवळ एरंड, फुलांचीमाळ, ऊस आणि पाच गौऱ्यांची होळी तयार करण्यात आली. मध्यान्ह आरतीच्या अगोदर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते पुजन करून तिचे दहन करण्यात आले. होळी सणानिमित्त साईबाबांच्या मुर्तीला साखरेपासून तयार केलेली गाठी घालण्यात आली. होळी दहनानंतर मध्यान्ह आरती पार पडली.