अहमदनगर - मराठी नववर्षाची सुरवात आज (शनिवार) ठिकठिकाणी गुढी-तोरणे उभारुन केली जाते. शिर्डीच्या साईबाबा मंदीरावरच्या कलशावर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांच्याहस्ते साई मंदिरावर गुढी आणि पंचागाची विधीवत पुजा करत श्रध्देची गुढी उभारण्यात आली.
साईबाबा मंदिरावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा - hindu new year
साई मंदीरातील सर्व धार्मिक पुजा विधी पंचागाप्रमाणे चालतात. यावेळी नवीन पंचागाची विधीवत पुजेप्रसंगी साई मंदिराचे मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी पौरोहित्य केले.
सकाळी साईबाबा मंदीराच्या कळसाजवळ साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी सपत्नीक विधीवत पुजा केली. साई मंदीरातील सर्व धार्मिक पुजा विधी पंचागाप्रमाणे चालतात. यावेळी नवीन पंचागाची विधीवत पुजेप्रसंगी साई मंदिराचे मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी पौरोहित्य केले. साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास श्रुंगार करण्यात आला होता. हिंदू नववर्षाच्या निम्मीताने शिर्डी पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रतून मोठया प्रमाणात साईभक्तांनी शिर्डीत येऊन साईंबाबांचे दर्शन घेतले. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानला विशेष महत्व आहे. निंब हा कडू असला तरी तो आरोग्यास हितकारक असतो. साईबाबांनीही आपल्या जीवनात अनेक कडू घटना पचवत जनमानवाला संदेश दिला. साईंच दर्शन घेत अनेक नवीन संकल्प या मराठी नववर्षाच्या निमीत्तान साईभक्त करतात.