माहिती देताना पोलीस उपअधीक्षक अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका हिंदू तरुणीचे अपहरण करुन तिला बिहार येथे नेण्याचा प्रयत्न झाला आहे. मोबाईलवर पब्जी गेम खेळताना दोघांची या मुलीसोबत ओळख झाली होती. महाराष्ट्रात येऊन ते मुलीला पळवून घेऊन जात होते. दरम्यान संगमनेर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. अकरम शहाबुद्दीन शेख व नेमतुल्ला शेख अशी अटक केलेल्या नराधमाची नावे आहेत.
कशी ओळख झाली : मोबाईलवर गेम खेळताना ओळख करणे संगमनेरमध्ये मुलीला महागात पडले आहे. पबजी आणि व्हाटसऍपच्या माध्यमातून संगमनेर येथील एका हिंदू तरुणीशी बिहार राज्यातील दोन मुलांनी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्या मुलीला भेटण्यासाठी या दोघांनी संगमनेर गाठले. गेल्या काही दिवसापूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केले जात असल्याचे समोर आले होते. आता थेट मुलींशी ओळख करुन त्यांना पळवून नेण्याचा प्रकार घडू लागला आहे.
मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न: बिहार राज्यातील दोन तरुण महाराष्ट्रात येऊन मुलीला भेटले. मुलीची ओळख पटल्यानंतर या दोघांनी त्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने वेळीच आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक तिच्या मदतीला धावून आले. मुलीचे अपहरण करण्याऱ्या बिहार राज्यातील अलीनगर दरभंगा येथील दोन तरुणांना स्थानिक नागरिकांनी पकडून संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी अकरम शहाबुद्दीन शेख व नेमतुल्ला शेख यांना अटक करून यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीला भेटायला बोलवले: बिहार राज्यातील अलीनगर दरभंगा येथील अकरम शहाबुद्दीन शेख व नेमतुल्ला शेख हे दोघे शुक्रवार दि.16 रोजी संगमनेर बस स्थानक येथे आले. अकरम याने पीडितेस फोन करुन सांगितले कि, मी संगमनेर बस स्थानकाला आलेलो आहे. येथे मला काही माहित नाही. त्यामुळे मी गुगलवर हॉटेल सर्च केले असता मला कसारा दुमाला परिसरात एक रिसॉर्टचे ठिकाण भेटले आहे, त्या रिसार्ट आम्ही थांबतो. माझे सोबत माझा मित्र नेमतुल्ला देखील आहे. आम्ही तेथे जाऊन जरा फ्रेश होतो. तू मला त्या ठिकाणी भेटायला ये असे त्याने सांगितले.
तरुणी भेटण्यासाठी गेली : दरम्यान, पीडित तरुणी देखील अकरम यास भेटण्यासाठी संबंधित रिसॉर्ट येथे गेली. तेव्हा त्याठिकाणी अकरम व त्याचा मित्र नेमतुल्ला असे दोघे आलेले होते. तेथे पीडित तरुणी आणि या दोघांनी गुलूगुलू गुप्पा मारल्या. परंतु येथे फार लोक आहेत. आपण थोडे लांब निवांत जागेवर जावुन बोलू. जेथे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. तेव्हा पीडित तरुणी त्यास म्हणाली की, तुला काय बोलायचे ते येथेच बोल. बाकी ठिकाणी मी येणार नाही. परंतु त्याने तिला विनंती केली. आम्ही इतक्या लांबून तुला भेटायला आलो आहे. तू एकांतात येऊ शकत नाही ? पण तरीही मुलीने नकार दिला.
असे घडला प्रकार : आरोपी म्हणाला तू माझा सोबत माझ्या गावाकडे बिहारला चल तू मला खुप आवडतेस, आपण दोघे लग्न करू. त्यावेळी पीडित तरुणीने त्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा ती म्हणाली तुला केवळ मित्र या नात्याने भेटण्यासाठी आलेली आहे. तुझ्या सोबत लग्न करणे किंवा तुझ्या सोबत पळुन जाणे असा कुठल्याही विचार माझा मनात नाही. असे ठणकावून सांगत ती तिच्या घरी जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात अकरम याने बळजबरीने तिचा हात पकडला. तो म्हणाला की, तुला माझे सोबत यावेच लागेल. मी तुझ्यावर प्रेम केले आहे. त्याने पुन्हा हात धरला तसेच तिला काही अंतरावर बळजबरीने ओढत नेले. तेव्हा मुलगी प्रचंड घाबरली.
दोघांनाही अटक करत गुन्हा दाखल : अकरमचा मित्र नेमतुल्ला हा देखील पीडितेला धमकावून सांगत होता. तुला आमचे सोबत यावेच लागेल. नाही तर आम्ही तुझ्या घरी येवुन तुझे व अकरम याचे प्रेमसंबंध आहे असे सांगू. या दोघांचा हेतू लक्षात आल्यानंतर पीडित मुलीशी त्यांची चांगलीच हुज्जत सुरु झाली. दोघांची धिटाई लक्षात घेऊन मुलीने एकच आरडाओरड केली. त्यानंतर रस्त्याने जाणारे काही लोक तेथे जमा झाले. त्यांनी मुलीस विचारले की काय झाले आहे ? तू अशी मोठ मोठ्याने का ओरडत आहे. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी उपस्थित जमावाने अकरम शेख व नेमतुल्ला यांना ताब्यात घेतले व मुलीची सुटका केली. नंतर हा प्रकार पोलीसांना कळविला दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडितेच्या फिर्यादीनुसार संगमनेेर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आलीआहे.
हेही वाचा -
- Little Girl Kidnapping Plan नऊ वर्षीय मुलीच्या सतर्कतेमुळे उधळला गेला अपहरणाचा कट संशयिताचा चेहरा सीसीटीव्हीत कैद
- Three accused trying to kidnap children बनावट कागदपत्राच्या आधारे बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड
- Minor Girl Kidnapping Attempt Wardha तळेगावात मंदिराचा पत्ता विचारत अल्पवयीन चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न