अहमदनगर - आज सायंकाळी नगर शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण आणि उत्तर भागामध्ये सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी नगर शहरात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे रस्त्यांवर आणि सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
नगर शहरासह जिल्ह्यात सायंकाळी पावसाची जोरदार बॅटिंग - अहमदनगर रेन न्यूज
सायंकाळी नगर शहरात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे रस्त्यांवर आणि सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
नगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस
यावेळी विजांचा कडकडाट दिसून येत होता, तर त्याचवेळी जोरदार पाऊस पडत होता. यावेळी पायी जाणारे आणि दुचाकी चालकांची एकच तारांबळ उडाली. शहरातील बागरोजा हडको, चितळे रोड, दिल्लीगेट आदी सखल भागांमध्ये पाणी साचले होते. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत असल्याचे वृत्त येत आहे.