अहमदनगर - उत्तर नगर जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
उत्तर नगर जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा अकोले तालुक्याला बसला. विजांचा कडकडाट,सोसाट्याचा वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांवरील आंबे गळून पडले आहेत. तर शेतात साठवून ठेवलेला कांदा देखील भिजला.
अवकाळी पावसाचा तडाखा; डाळींब बागांचे नुकसान, घरांची पत्रे उडाली - ahamadnagar
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा अकोले तालुक्याला बसला. विजांचा कडकडाट,सोसाट्याचा वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांवरील आंबे गळून पडले आहेत. तर शेतात साठवून ठेवलेला कांदा देखील भिजला.
याचबरोबर काही ठिकाणी डाळींब बागांचे नुकसान झाले आहे. यावेळी आमदार वैभवराव पिचड यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी भेट दिली. दरम्यान, पिचड यांनी पाहणी करत महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत, आशी मागणी केली आहे.
शिर्डी परिसरातील द्वारकानगर भागातील संभाजी नागरे यांच्या राहत्या घराची पत्रे उडून गेली आहेत. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी फर्निचर, मौल्यवान वस्तू, दैंनदिन वापरातील वस्तू आणि घराचे जवळपास एका लाखाचे नुकसान झाले असल्याचे संभाजी नागरे यांनी सांगितले.