अहमदनगर- शिर्डी जवळील राहाता येथे आयोजित दोन दिवसीय काँग्रेस युवा मंथन शिबिराची आज सांगता झाली. या मंथन शिबिरात पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती काय असावी, याविषयी या शिबिरात चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपकडून जनतेची दिशाभूल- हार्दिक पटेल - Shirdi
शिर्डी जवळील राहाता येथे आयोजित दोन दिवसीय काँग्रेस युवा मंथन शिबिराची आज सांगता झाली. या मंथन शिबिरात पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पटेल यांनी भाजपवर टिका केली.
राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपकडून जनेतेची दिशाभूल केली जात आहे. देशातील सव्वाशे कोटी जनता ही राष्ट्रवादी आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असुन भावनिक मुद्दे राजकारणात शोभा देत नसल्याची टीका हार्दिक पटेल यांनी यावेळी केली.
तरुण कार्यकर्ता हा काँग्रेसचा पाठीचा कणा आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्यात सुधारणा करून पुढे जावू. काँग्रेसने 60 वर्षात केलेली विकासात्मक कामे गावागावात पोहोचवू. तसेच जनता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत जोडली जाईल, असा विश्वासही हार्दिक पटेल यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसवर जनतेचा विश्वास असल्याने भाजप-शिवसेने विरोधात जनता एकवटेल आणि काँग्रेस सोबत राहील, असेही हार्दिक यांनी यावेळी सांगितले.