अहमदनगर - जामखेडमध्ये महिलांचे केस असलेली पाच पोती चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीची चार पोती जप्त केली आहेत. संबंधित आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
अहमदनगरमध्ये महिलांच्या केसांची ५ पोती चोरीला; टोळी गजाआड - ahmednagar crime news
जामखेडमध्ये महिलांचे केस असलेली पाच पोती चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीची चार पोती जप्त केली आहेत.
सचिन तायप्पा वाघमोडे यांनी तक्रार दिली होती. यानुसार 31 जुलै 2019 रोजी राहत्या घरासमोरील पडवीतील महिलांच्या केसांची पाच पोती चोरीला गेल्याचे त्यांनी नमूद केले. याची किंमत जवळपास सहा लाख 30 हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. यातील पाच आरोपी राम महादेव राठोड, बाळू यादव लोखंडे, विशाल बाळू लोखंडे, सागर बाळू लोखंडे, प्रकाश उर्फ पारस छगन काळे यांना अटक केली होती. तर सहावा आरोपी विकास मिलिंद घायतडक फरार होता.
मिलिंद घायतडक अरोळेवस्ती येथील झोपडपट्टीत आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार, जामखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने तीन दिवसांची आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान, घरात लपवून ठेवलेले 20 किलो महिलांचे केस पोलिसांनी जप्त केले आहेत.