शिर्डी (अहमदनगर) - शिर्डीच्या साईबाबांना गुरू स्वरुप मानून गुरू प्रती आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी लाखोंचा जनसागर शिर्डीत दरवर्षी उसळत असतो. मात्र, कोरोनामुळे यावर्षी भाविकांविनाच साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा केला जात आहे.
साई मंदिरात भाविकांविनाच साजरा केला जातोय गुरुपौर्णिमा उत्सव - साईबाबा बातमी
दरवर्षी मोठ्या जनसमुदायासह शिर्डीत गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. पण, यंदा सुरू असलेल्या कोरोनामुळे भाविकांना साईदर्शनासाठी मंदिर बंद आहे. यामुळे भाविकांविनाच गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे.
साईंच्या गुरुस्थान मंदिरातही एक वेगळे महत्व आहे. साईबाबांना गुरू मानत आज (दि. 5 जुलै) गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविक येत असतात. मात्र, 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव भाविकांविनाच साजरा केला जात आहे. शनिवारी (दि. 4 जुलै) पासून सुरु झालेला गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस असल्याने आजच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतीमा,पोथी आणि विणा यांची सवाद्य मिरवणूक गुरुस्थानमार्गे द्वारकामाईत नेण्यात आली. त्यानंतर साईंच्या मुर्तीस मंगलस्नान घालण्यात आले. साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. तसेच साईच्या मुर्तीला सुवर्ण आभूषण घालण्यात आले आहेत.
हेही वाचा -मामा-मामीने मोठ्या धाडसाने भाच्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवले