शिर्डी - शिर्डी साईबाबांना ( Shirdi Sai Baba Temple ) आज हैद्राबाद येथील दानशूर साईभक्त डॉ. रामकृष्ण यांनी साईबाबांना दान स्वरुपात सोन्याचा मुकुट दिला ( Golden Crown Donated To Sai Baba) आहे. खूपच आकर्षक मुकुट असून मुकुटावर डायमंडचा साज चढवण्यात आला असून ओम या नावाची छबी रेखाटण्यात आली आहे. तर मुकुटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आले आहे. हा मुकुट दानशूर भाविकाच्या इच्छेनुसार आज मध्यान्ह आरती दरम्यान साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात येत आहे.
पत्नीची शेवटची इच्छा -हैद्राबाद येथील दानशूर साईभक्त डॉ. रामकृष्ण यावेळी सांगतात की, सन 1992 मध्ये ते सपत्नीक शिर्डीला साईबाबा दर्शनसाठी आले होते. यावेळी आरती दरम्यान मुकट चढवताना त्यांची पत्नी रत्नाम्मा यांनी पाहीले. तेव्हाच त्यांनी बाबांना असाच सोन्याचा मुकट चढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परिस्थिती अभावी तेव्हा ते शक्य झाले नाही. दरम्यानच्या काळात रत्नाम्मा यांचे निघन झाले. मात्र पत्नीची शेवटची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. यावेळी पैसे जमवण्यासाठी डॉ रामकृष्णा यांनी अमेरिकेत काम सुरु केले. पैशाची पुर्तता करुन ते भारतात आले व हैद्राबाद येथे बाबांसाठी सोन्याचा मुकट तयार करुन घेतला. ज्याचे वजन 742 ग्रॅम असल्याचे सांगत किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचे साईभक्त रामकृष्ण सांगीतले आहे.