अहमदनगर - विजेच्या धक्क्याने २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील पोलीस मुख्यालय वसाहतीत घडली आहे. पूजा सुनील कुर्हे असे मृत तरुणीचे नाव आहे.
अहमदनगरमध्ये वीज वितरण कार्यालयाचा हलगर्जीपणा; विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू - अहमदनगर
अहमदनगरमध्ये वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.
मृत पूजा
पूजा पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी असून ती एमबीएचे शिक्षण घेत होती. गेल्या ४-५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे आणि भिंतीमध्ये विद्युतप्रवाह वाहत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे वीज वितरण कार्यालयाकडे तक्रारदेखील केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आज पुजाला विजेचा धक्का बसला. त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.