महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युती सरकार मागच्या सरकारचं खरकटं धुण्याच काम करत आहे - गिरीष महाजन - congress

ल्या ७० वर्षात मागील सरकारने अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले. दर वर्षी नविन काम आणि त्यातुन नवीन कमीशन. मात्र, भाजप सरकारने यांचे सगळे खरकटे धुण्याचे काम सुरू केले आहे.

गिरीश महाजन

By

Published : Feb 24, 2019, 8:52 PM IST

अहमदनगर- गेल्या ७० वर्षात मागील सरकारने अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले. दर वर्षी नविन काम आणि त्यातुन नवीन कमीशन. मात्र, भाजप सरकारने यांचे सगळे खरकटे धुण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

गिरीश महाजन

या कार्यक्रमाला जलसंवर्धनमंत्री राम कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले, की अनेक प्रश्नांवरुन लोक आंदोलन करतात. मी आमदार असताना कापसाच्या दरासाठी आंदोलन केले. ११ दिवस त्यावेळच्या सरकारच्या साध्या राज्यमंत्र्यानेही आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र, आत्ताच्या सरकार मधील मंत्री लगेच आंदोलकांकडे तडजोड करायला जातात.


अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून ते किसान सभेच्या आंदोलनापर्यंत तडजोड करण्याची जबादारी माझ्याकडे देण्यात आली आहे. त्यावर मंचावर उपस्थित असलेल्या राम कदम यांनी आता तडजोडीसाठी वेगळे खाते असावे, असे मिश्किल उत्तर दिले. मला तडजोड मंत्री करून माझ्याकडे असलेले खाते काढुन घेऊ नका, म्हणजे झाले, असे महाजन म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

ABOUT THE AUTHOR

...view details