अहमदनगरCM Siddaramaiah: येथे जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. प्रसंगी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीतून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण केली. तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांतीमध्ये योगदान दिलं. भारत अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण आहे तो फक्त काँग्रेसमुळेच. (Cooperative Sector)
भाजपा ही भ्रष्ट पार्टी: सिद्धरामय्या म्हणाले की, सहकार चळवळ ही ग्रामीण भागाला सशक्त बनवते. मात्र, केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढू पाहत आहे. राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत. भाजपा ही भ्रष्ट पार्टी असून कर्नाटकमध्ये 40% कमिशन घेत होते. त्यामुळे जनतेने त्यांचा मोठा पराभव केला. राज्यात पाच कलमी विकास योजना निवडणुकीपूर्वी जाहीर करावी. संपूर्ण देशात काँग्रेसमय वातावरण असून भाजपाची हुकूमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.
भाजपाची वसाहतवाद योजना धोक्याची:देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेस पार्टी लढली असून आताचे सत्ताधारी त्यावेळेस कुठेही नव्हते. मागील सत्तर वर्षातील प्रगती ही काँग्रेसमुळे झाली असून लोकशाही आणि संविधान धोक्यात असून भाजपा वसाहतवाद योजना आणत आहे. ही देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक असल्याची टीका करताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाऊसाहेब थोरात यांच्या रचनात्मक कार्याचा वारसा जपला असल्याचंही सांगितलं.
संगमनेर ही सहकाराची पंढरी ठरली:माजी मंत्री भास्करराव जाधव म्हणाले की संगमनेरचे सहकार, शिक्षण, नम्रता ही राज्यासाठी दिशादर्शक आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या संस्कारातून बाळासाहेब थोरात काम करत असून प्रगतशील तालुका ही ओळख राज्यात नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे या दोन विभूतींनी हा परिसर सुजलाम सुफलाम केला. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर ही सहकाराची पंढरी ठरली आहे. सध्या एकनिष्ठता राहिली नसून सत्तेसाठी लोकं पक्ष बदलत आहेत. देशांमध्ये दोघेजण हुकूमशाहीतून देश हातात घेत आहेत. खोटा इतिहास सांगत आहेत. 2014 ला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतात. मग 1947 ला स्वातंत्र्य मिळालं ते काय होतं? ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यावेळी अनेकांनी प्राणांची आहुती दिली, तुरुंगवास भोगला त्यांची तुम्ही थट्टा करत आहात, असा टोलाही भाजपला लगावला.
सभेला 'या' मान्यवरांची उपस्थिती:यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच के पाटील, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्करराव जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार झिशन सिद्दकी, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, बाजीराव पा. खेमनर, रणजीत सिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, आमदार शिरीष दादा चौधरी, आमदार राजेश राठोड, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार लहू कानडे, आदींसह राज्यभरातील आजी-माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा:
- 'हे' बोलणं बरं नव्हं; राज ठाकरेंनी टोचले मराठी कलाकारांचे कान
- मेरे पास ये है, वो है, तुम्हारे पास क्या है? उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं
- पंतप्रधान मोदींवरील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, मालदीवचे तीन मंत्री निलंबित