महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धसका; नेपाळवरुन संगमनेरात आलेल्या १४ पैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण - कोरोना बाधित

नेपाळवरुन आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३७ वर गेली आहे.

Ahmednagar
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 23, 2020, 8:34 PM IST

अहमदनगर- नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३७ वर गेली आहे. ४ एप्रिलला या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते.

ताब्यात घेतलेल्या या व्यक्तींची तपासणी केली असता, अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, १४ दिवसानंतर १० जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व व्यक्तींना संगमनेर येथे संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

या ४ व्यक्तींचा देखरेखीखाली असण्याचा कालावधी संपणार होता. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात, १० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह तर ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details