अहमदनगर- जिल्ह्यातील अकोले येथील रहीवासी असलेले माजी सैनिक राजेंद्र मंडलीक यांना रात्री अनोळख्या वक्तीने श्रीरामपुरातुन अपहरण करत त्यांना बेदम मारहाण केली आहे. यात मंडलीक यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली आहे.
माजी सैनिकाचा अपहरण करत बेदम मारहाण - police station
जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेले माजी सैनिक राजेंद्र मंडलीक यांना रात्री अनोळख्या वक्तीने श्रीरामपुरातुन अपहरण करत त्यांना बेदम मारहाण केली आहे.
जखमी राजेंद्र मंडलीक
अपहरण करुन मंडलीक यांना शिर्डी जवळील डोर्हाळे येथे मारहाण करून रस्त्याच्या कडेला फेकुन देत अपहरणकर्ते पसार झाले. या घटनेची माहिती शिर्डी पोलीसांना मिळताच त्यांनी रुग्णवाहीतून जखमी मंडलीक यांना उपचारासाठी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात दाखल केले आहे. माझ्यावर पाळत ठेवून हल्ला केल्याचे जखमी राजेंद्र मंडलीक यांनी सांगितले आहे. मंडलीकवर हल्ला कशामुळे झाला हल्लेखोर कोण याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
Last Updated : Sep 1, 2019, 11:15 AM IST