महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी शिपायानेच फोडले शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे; शिर्डी येथील प्रकार - साईनाथ माध्यमिक विद्यालय

माजी शिपायानेच शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचा प्रकार शिर्डी येथील साईनाथ माध्यमिक विद्यालयात घडला. अमोल अहिरे असे शिपायाचे नाव आहे. तो दररोज शाळेत मद्यपान करुन येत असल्याने शाळेच्यावतीने अमोलवर कारवाई करण्यात आली होती.

माजी शिपायानेच फोडले शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे

By

Published : Aug 17, 2019, 5:06 PM IST

शिर्डी -शहरातील साईनाथ माध्यमिक विद्यालयातील अमोल अहिरे या शिपायाने शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या कर्मचाऱ्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माजी शिपायानेच फोडले शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे
साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या साईनाथ माध्यमिक विद्यालयात अमोल अहिरे हा शिपाई पदावर होता. तो दररोज शाळेत मद्यपान करुन येत असल्याने शाळेच्यावतीने अमोलवर कारवाई झाली होती. अमोलला नोकरीतूनही काढण्यात आले. याच रागातून गेल्या काही माहिन्यांपासून अमोल शाळेत येऊन शाळेतील छोट्या-मोठ्या वस्तुंचे नुकसान करत होता. हा शिपाई मद्यपान करुन येत असल्याने शिक्षकदेखील त्याला घाबरत होते. आज (शनिवार) या शिपायाने शाळेच्या परिसरातील पाच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून शाळेचे 70 हजार रुपयांचे नुकसान केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी अमोल अहिरे याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details