महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar Convoy Stop : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकऱ्यांनी ताफा अडविला - Pawar convoy was blocked by farmers

अकोले येथील अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतांना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Former Deputy Chief Minister Ajit Pawar) अकोले येथे दाखल झाले असता, शेतकऱी गटाने त्यांचा ताफा अडविला.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Jul 15, 2022, 5:02 PM IST

शिर्डी (अहमदनगर) :अकोले येथील अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतांना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Former Deputy Chief Minister Ajit Pawar) अकोले येथे दाखल झाले असता, त्यांचा ताफा अडविण्यात आला. तसेच, पवार यांना (Former Deputy Chief Minister Ajit Pawar) व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला होता. याआधारे पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा रोखताना शेतकरी गट



अजित पवार यांचे आज सकाळी अकोले तालुक्यात आगमन झाले. सभा सुरू होण्यापूर्वी ते अकोले तालुक्यातील माणिक ओझर येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते.

अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणूक:शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारार्थ अकोलेजवळील विठ्ठल लॉन्स येथील आयोजित सभेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी पवार यांना इशारा दिला होता. मी अजित पवार यांना सभेच्या व्यासपिठावर शांततेच्या मार्गाने जाऊन भेटणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी मी त्यांना भेटलो होतो तेव्हा अजित पवार यांनी मला मााघार घ्यावी म्हणून विनंती केली होती. ती विनंती मान्य करताना पवार यांना 'गायकरांना तुम्ही आता पवित्र करुन घेताय. पण अगस्ति कारखाना निवडणूकीवेळी तुमच्या पॅनलचे गायकर नेतृत्व तर नाहीच पण ते उमेदवार सुध्दा असता कामा नये', अशी अट सावंत यांनी त्यांना घातली होती. तेव्हा त्यांनी कारखाना निवडणूकीवेळी एकत्र बसून निर्णय करु असे अजितदादांनी सांगितले. तर अजितदादांनी मी जिल्हा बँकेच्या वेळी माघार का घेतली ? हे आजच्या सभेत सांगावे. तसेच विधानसभा निवडणूकीच्यावेळी अकोलेकरांना जो शब्द दिला होता. '21 ला मतदान करा, 21 नंतर मी फेडतो', असे म्हटले होते. त्याचे काय झाले? अजित पवार हे त्यांच्या पॅनलच्या प्रचाराला अकोल्यात आले आहेत. याचा खुलासा करावा यासाठी त्यांना मी भेटणार आहे. असे सावंत यांनी यापूर्वी जाहीर केले होते.

हेही वाचा:अमरावती : दर्यापूर तालुक्याला मुसळधार पावसाच फटका; शेतात साचले गुडघाभर पाणी

ABOUT THE AUTHOR

...view details