महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जर्मनीसह रशियातील 23 नागरिकांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन - शिर्डी साईबाबा विदेशी नागरिक भेट

शिर्डीच्या साईबाबांचा सबका मालिक एकचा महामंत्र  विदेशातील नागरिकांनीही गायला. रशिया आणि जर्मनी येथील 23 विदेशी नागरिकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईनामाचा आणि हर हर महादेव असा जय घोषही केला.

जर्मनीसह रशियातील 23 नागरिकांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन

By

Published : Nov 6, 2019, 2:11 PM IST

अहमदनगर - शिर्डीच्या साईबाबांचा सबका मालिक एकचा महामंत्र विदेशातील नागरिकांनीही गायला. रशिया आणि जर्मनी येथील 23 विदेशी नागरिकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईनामाचा आणि हर हर महादेव असा जय घोषही केला.

जर्मनीसह रशियातील 23 नागरिकांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन

हेही वाचा - शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन नैराशाच्या गर्तेतून बाहेर काढा - अशोक चव्हाण

शिर्डी साईबाबाचे रशिया आणि जर्मनी या दोन देशातील काही नागरिकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील विश्वस्त कक्षामध्ये या विदेशी भाविकानी काही तास ओम नमः शिवाय साई देवाय नामचा जय घोष केला. हातात गिटार ढोलकी आणि साई नामाचा जय घोष करत काही तास या नागरिकांनी साई संस्थानच्या भजनात भाग घेतला. यावेळी साई संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर तसेच संस्‍थानचे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे जनसंर्पक अधिकारी मोहन यादव यांनी या विदेशी नागरिकांना साई शॉल मूर्ती देऊन सन्मानित केले. देशभरातून दररोज हजारो भाविक शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात याच प्रमाणे आता विदेशी लोकही येत आहेत. वर्षा भरात लाखोंच्यावर विदेशी नागरिक साई समाधीचे दर्शन घेत असतात.

हेही वाचा - 'महायुतीला शेतकऱ्यांपेक्षा मुख्यमंत्री कोण होणार याचीच काळजी'

ABOUT THE AUTHOR

...view details