अहमदनगर - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्याची बातमी संगमनेरमध्ये पोहोचताच तालुक्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
थोरात काँग्रेसचे गटनेते झाल्यानंतर समर्थकांतर्फे संगमनेरसह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल व फुलांची उधळण केली.
बाळासाहेब थोरातांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड; संगमनेरमध्ये जल्लोष - balasaheb thorat news
बाळासाहेब थोरात काँग्रेसचे गटनेते झाल्यानंतर समर्थकांतर्फे संगमनेरसह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल व फुलांची उधळण केली.
बाळासाहेब थोरात 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून सलग 8 वेळी विजयी झाले आहेत. अडचणीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळून त्यांनी पक्षाला नवी संजीवनी दिली. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झालेल्या दारुण पराभव झाला. यानंतर अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. नंतर वरिष्ठ नेतृत्वाने थोरात यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.
महाराष्ट्रात यापूर्वी महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोजगार हमी, जलसंधारण अशा महत्त्वाच्या पदांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.