अहमदनगर : शिर्डीतील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोरोना नियम उठल्या नंतरही साईमंदीरात हार, फुले वाहण्यास असलेली बंदी कायम असल्याने, शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. येत्या 15 दिवसात बंदी उठवली नाही तर फुल उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
फुलहार बंदी उठवली नाही :शिर्डीत जगप्रसिद्ध साईमंदीर असल्याने या ठिकाणी येणारे भाविक साई मंदिरात फुले वाहत असल्याने, परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी हजारो एक्कर क्षेत्रात गुलाब फुलांच्या बागा फुलवल्या आहेत. साई मंदीरामुळे फुलांना स्थानिक ठिकाणीच बाजारपेठ उपलब्ध होवून शेतकऱ्यांना फुले विक्रीतून पैसा मिळत होते. मात्र गेल्या काही वर्षापासून साईमंदीरात हार, फुले व प्रसाद नेण्यास बंदी घातली गेली. त्यात कोरोनाचे कारण महत्वाचे ठरले होते. मात्र करोनाचे सर्व नियम शिथील होवूनही साईमंदीरात असलेली फुलहार बंदी उठवली गेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
आंदोलनाचा दिला इशारा :एक फुल बाग लावल्यानंतर झाडाला फुल येण्यासाठी 2 वर्ष वाट पाहील्या नंतर फुले येण्यास सुरवात होते. शिर्डीत फुलाला चांगली मागणी असल्याने, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुल बागा फुलविल्या होत्या. मात्र कोरोना पूर्वी एक वर्ष आणि नंतर कोरोना काळात फुले वाहण्यास बंदी असल्याने, शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनानंतर सर्व निर्बंध उठुनही साईमंदीरात फुले, हार, प्रसाद नेण्यावरची बंदी आज न उद्या उठले या आशेवर शेतकऱ्यांनी बागा तश्याच ठेवत त्या जोपासल्या. मात्र, आता आधी साई संस्थान आणि नंतर फुल बंदी उठविण्याच प्रकरण हायकोर्टात लटकल्याने, शेतकऱ्यांना समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. येत्या पंधरा दिवसात साई मंदिरातील फुल बंदी उठवली नाही तर, आंदोलन करणार असल्याचा इशारा सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा -
- Draupadi Murmu dined at Sai Prasadalaya: शिर्डीच्या साई प्रसादालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला भोजनाचा आस्वाद; शेंगदाण्याच्या चटणीची केली प्रशंसा
- Shirdi Sri Sai Palkhi Garden : शिर्डी नगरपंचायतीने भाविकांसाठी उभारले तब्बल अडीच कोटींचे गार्डन
- Vip Darshan Shirdi: साईदर्शनाकरिता व्हीआयपीच्या नावाखाली होणारी बोगसगिरी थांबणार, संस्थानने घेतला महत्वपूर्ण निर्णय