अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या यंत्रणेने सोमवारी (दि. 8 जून) सकाळी दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी बारा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांना रविवारी डिस्चार्ज दिल्याची दिलासादायक माहिती दिली प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२१ वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात 80 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्यांमध्ये नगर शहरातील पाच, संगमनेर येथील दोन, राशीन (कर्जत) येथील दोन नेवासा, राहता आणि अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
निघोज (ता. राहता) येथील एका 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे, तर प्रवरा नगर येथील 34 वर्षीय महिला व अकरा वर्षाच्या मुलाला कोरोना झाला आहे. नगर शहरातील पाचपीर चावडी येथील 48 वर्षीय व्यक्तीला बाधित रुग्णाच्या संपर्कातून कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील 14 वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाचे आकडे
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या - 212
महानगरपालिका क्षेत्र -47
अहमदनगर जिल्हा - 108