अहमदनगर - जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, अकोले तालुक्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील ४, तर अकोले तालुक्यातील एकास कोरोनाची लागण - कोरोना रुग्णसंख्या अहमदनगर बातमी
संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एकाच कुटुंबातील तिघेजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, गुंजाळवाडीमध्ये एका 57 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे अकोले तालुक्यातील 50 वर्षीय व्यक्तीही कोरोनाबाधित आढळून आला आहे.
संगमनेर तालुक्यातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये निमोण येथील एकाच कुटुंबातील तिघेजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात 30 व 31 वर्षीय महिला आणि 13 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच गुंजाळवाडीमध्ये एका 57 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. सदर महिला ही गुंजाळवाडी येथील स्थायीक असून सध्या ती इंदिरानगर येथे राहत आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. तर, गुंजाळवाडी परिसरातील नागरीकांनी घाबरून न जाता आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
दुसरीकडे अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी येतो न येतो तोच समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला 50 वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोनाबाधित आढळून आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी दिली आहे.