महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये 'या' ठिकाणी भरतोय लुकलुकणाऱ्या काजव्यांचा नेत्रदीपक सोहळा - कळसुबाई शिखर

शिखरस्वामिनी कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत.

काजवे

By

Published : Jun 15, 2019, 2:30 PM IST

Updated : Jun 15, 2019, 2:48 PM IST

अहमदनगर -अकोले तालुक्यातील भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर लक्ष-लक्ष काजव्यांची मायावी दुनिया अवतरते. मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा, या दरम्यान हा अद्भुत देखावा बघायला मिळतो. हा देखावा बघण्यासाठी मुंबई-पुणे आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात.

भंडारदरा-घाटघर परिसरात काजवे पाहण्यासाठी होणारी गर्दी

शिखरस्वामिनी कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. यामुळे ही झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात. झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. तर कित्येक काजवे झाडांभोवती पिंगा घालतात.

काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटक आहे. त्याला ६ पाय आणि पंखाच्या २ जोड्या असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. या लहान झुरळाइतक्या आकाराच्या किटकाचे शरीर ३ भागात विभागलेले असते. मे महिन्यात त्यांचे जीवनचक्र सुरू होते. तर जून महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांच्या संख्येत मोठी भर पडते. मोसमी पावसाच्या तोंडावर ही संख्या लक्षावधी होते. यावेळी या भागातील अनोख्या काजवा महोत्सवाला सुरूवात होते आणि मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर या काजव्यांच्या जीवनचक्राची अखेर होते.

Last Updated : Jun 15, 2019, 2:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details