अहमदनगर- राहूरी तालुक्यातील सोनई येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मनोज जनरल स्टोरला भीषण आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे. आग विझवण्यासाठी मुळा कारखाना, भेंडा कारखाना, राहुरी आणि शनैश्वर देवस्थानचे अग्नीशामक दल प्रयत्न करत आहेत.
राहूरीतील जनरल स्टोरला भीषण आग, संपूर्ण साहित्य जळून खाक - lockdown in country
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे कळताच बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. दुकानात शालेय पुस्तके, वह्या तसेच इतर साहित्य होते. आगीत दुकान जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मनोज जनरल स्टोअर्सचे मालक मनोज चंगेडिया यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुकाने अनेक दिवसांपासून बंद आहेत. आग लागलेल्या या दुकानाशेजारी कापड, दागिने, किराणा, कृषी सेवा, इलेक्ट्रॉनिकची दुकाने आहेत. त्यामुळे, इतर दुकांनाना आगीचा धोका पोहचू नये यासाठी प्रशासन उपाय करत आहे.