अहमदनगर- जिल्हयात व राज्यामधील इतर जिल्हयांमध्ये वा इतर राज्यामध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींच्या प्रवासासाठी राज्य सरकारने कार्यपध्दती निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीसाठी सोयीचे व्हावे यासाठी https://covid19.mhpolice.in लिंकद्वारे माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून येण्या-जाण्यासाठी 'या' लिंकवर भरा माहिती
नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पदसिध्द नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पदसिध्द नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हयामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हयातून बाहेरच्या जिल्हयामध्ये जाणाऱ्या व्यक्तींसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- नोडल अधिकाऱ्यांचे फोन नंबर -
- जिल्हयामध्ये बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी -
- नोडल अधिकारी जितेंद्र पाटील - 9763739974
- पुनर्वसन शाखेचे तहसीलदार महेश पवार - 8956799922
- करमणूक कर शाखा नायब तहसीलदार सुनिल पाखरे - 9309881788
- पुनर्वसन शाखा अव्वल कारकून अमोल झोटींग - 9922426717
- कुळकायदा शाखा अव्वल कारकून शेखर साळूंके - 9881119866
- सं.गा.यो. शाखा लिपीक भगवान सानप - 9130836918
- बाहेरच्या जिल्हयामध्ये जाणाऱ्या व्यक्तींसाठी फोन नंबर -
- उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील - 9130799939
- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील - 7020739411
- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गिते - 9403709123
- निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे - 9881304874
- गृह शाखा नायब तहसीलदार राजू दिवाण - 9890929510
- निवडणूक शाखा अव्वल कारकून राजेंद्र शिंदे - 7588543715
- करमणूक कर शाखा अव्वल कारकून संदेश दिवटे - 7020945296
- ग्रामपंचायत शाखा लिपीक प्रवीण कांबळे -7020360085